बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पाकड्यांनी भारतात पाठवलेत अफगाण दहशतवादी???; ‘या’ भागांवर हल्ला होण्याची शक्यता!

नवी दिल्ली | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा जीव गेला आहे. अशातच आता भारतात अफगाणी दहशतवादी घुसल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे भारतात कुठेतरी मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात भारताच्या गुप्तचेर संस्थांनी केंद्र सरकारला अलर्ट केलं आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर दहशतवादी संघटनांना अलिकडील दहशतवादी हल्ल्यावरून अधिक बळ आल्याचं चित्र दिसत आहे. समोर आलेल्या बातमीनुसार अफगाण दहशतवाद्यांना पाकिस्तानची सीमा पार करून दिली जात आहे. त्यानंतर भारतातील मिलिट्री कॅम्प, मोठी सरकारी कार्यालयांवर दहशतवादी निशाणा साधणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचेर संस्थेने दिली आहे.

उरी सेक्टरच्या अंनगूर पोस्टजवळील सीमेवरील तारा कापून अफगाणी दहशतवाद्यांना भारतात प्रवेश दिलं आहे. त्यावेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक भारतीय सैनिक देखील जखमी झाला आहे. या दहशतवाद्यांना जम्मू काश्मिरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून मदत दिली जात  असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अफगाण दहशतवाद्यांची माहिती समोर आल्यानंतर भारतीय सैनिकांनी उरी सेक्टरमध्ये 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. असं असलं तरी या भागात मोबाईल आणि इंटरनेट सुविधा सुरू आहेत. परंतु सीमेवरील भागातील दुरसंचार व्यवस्था ठप्प करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

ठेच लागता पायी, वेदना होई तिच्या ह्रदयी! लेकराला मृत्यूच्या दारातून आणलं परत, पाहा व्हिडीओ

”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं- किशोरी पेडणेकर

”आमचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास, ते आमचा मान ठेवतील”

पुन्हा हादरली मुंबई! अल्पवयीन मुलीवर 30 जणांकडून सामूहिक बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More