Top News आरोग्य कोरोना देश

भाजपच्या मुख्यमंत्र्यावर टीका; पत्रकाराला घरात घुसून मारहाण

अगरतळा | मुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुक पोस्ट केल्याने एका पत्रकाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्री बिप्लव देव विरोधात पोस्ट टाकल्याने अज्ञातांनी पत्रकाराला मारहाण केली आहे. सध्या या पत्रकारावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्रिपुरातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी कोरोनाच्या परिस्थितीत असलेल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या.

त्रिपुरातील बंगाली नावाच्या वर्तमान पत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनातून बरं झाल्यानंतर त्यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून मुख्यमंत्री देव यांच्यावर टीका केली. या व्हिडिओमध्ये पाराशर यांनी, ‘मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, त्यांनी पत्रकारांना धमकवू नये,’ असं म्हटलं होतं.

यानंतर पाराशर यांच्या घरी शनिवारी काही अज्ञात व्यक्ती घुसल्या आणि त्यांनी पाराशर यांना मारहाण केली. त्यांच्यावर उपचार सुरु असून या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलंय?, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे…”

भाजप प्रवक्त्याने मराठी अभिनेत्रींबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बांदेकर संतापले; म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला”

“50 वर्षांत शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?, आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती”

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या