बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये रोज पैसे भरा अन् ‘इतके’ लाख मिळवा

मुंबई । आयुष्य मनासारखं जगता यावं म्हणून सर्वजण काही न काही धडपड करत असतात. काही जण आपल्या भविष्यासाठी पैसे गुंतवणूक करत असतात. काही जण एलआयसीमध्ये म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये आपलं खातं काढून त्यामध्ये आयुष्यभरासाठीची गुंतणूक करत असतात.

एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन पॉलिसी काढत असते. अशीच एक पॉलिसी एलआयसीने काढली ज्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवता येतात.

या पॉलिसीमध्ये दोन प्रकार असून दोन्ही सारख्याच आहेत प्रीमियम टर्म आणि पॉलिसी टर्म. म्हणजे जेवढ्या मुदतीची तुमची पॉलिसी तेवढ्याच मुदती पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. एवढंच नव्हे तर यामध्ये तुम्ही महिन्यांसाठी जर 1400 रुपये जमा केले तर तुम्हाला शेवटी 25 लाख रुपयांपर्यंत रिटर्न्स मिळतील. एका दिवसाचा हिशोब केल्यास, दिवसाला तुम्ही फक्त 47 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवू शकता.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More