… तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू; भाजपची मोठी घोषणा!

मुंबई | आगामी निवडणुकात शिवसेनेची एक जरी जागा जास्त अाली तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू, अशी घोषणा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला चालतील का? असा प्रश्ऩ चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, मुख्यमंत्री हा भावनिकतेवर होत नसतो. शिवसेना हा भावनिक पक्ष आहे, मात्र ज्याचा जास्त आकडा येईल किंवा शिवसेनेचा एक जरी आकडा जास्त आला तर उद्धव म्हणतील तो मुख्यमंत्री आम्ही बनवू.

दरम्यान, शिवसेनेनं भाजपसोबत यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे, तसंच शिवसेनेसोबत खासगीत चर्चा सुरू आहे, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेसोबत खासगीत युतीची चर्चा; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

-जलयुक्त शिवारचे साडे सात हजार कोटी कुठं गेले?; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-दुष्काळ सदृश्य, राजा अदृश्य; विखे-पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

-शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाल्यास मी सहन करणार नाही- उदयनराजे

-सत्तेसाठी भुकेलेले भाजप नेते पर्रिकरांना आरामही करू देत नाहीत!