बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई | शिवसेनेच्या पुढच्या वर्षीच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान असेल. त्यामुळे आता कामाला लागा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशावरून शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेच योग्य असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-आमचा पक्ष कचरा बाहेर फेकतोय आणि मोदी जमा करतायेत; ममतांचा मोदींवर निशाणा

-बदललेल्या नियमानुसार फडणवीसांना आता ‘फडण दोन शून्य’ म्हटलं जाईल; मनसेची टीका

-सुधरा नाहीतर… पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी 85 पोलिसांना ‘कामाला लावलं’!

-सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ

-राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस आक्रमक; एम्प्लॉयमेंट ऑफिसला ठोकणार टाळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More