बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू- रविंद्र भेगडे

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपकडून शनिवारी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर आता भाजप युवा मोर्चा मावळचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू, असा इशारा सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये असलेलं हे महाविकास आघाडीचं सरकार समाजामध्ये अस्वस्थता आणि असंतोष खदखदत ठेऊन स्वतः मात्र सत्तेची मलई खाण्यात मग्न आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चालढकल करत दिरंगाई केली आणि सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला स्वतः कमी पडल्यावर सर्व जबाबदारी केंद्रावर ढकलून दिली, असा आरोप रविंद्र भेगडे यांनी केला आहे.

आता देखील ओबीसी समाजाच्या शिक्षणाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राखीव जागांच आरक्षण हे पूर्णपणे राज्यसरकारची जबाबदारी आहे. राज्यांना तो अधिकार घटनेनं दिला आहे. तर त्यावर उपाययोजना म्हणून तात्काळ आयोग नेमून प्रत्येक जिल्ह्याची माहिती गोळा करण्याऐवजी निवडणुका पुढे ढकलण्याचं काम हे सरकार करत आहे. कारण तिघां पक्षांनाही माहीत आहे की, जर निवडणूका लागल्या तर हे तिघाडी सरकार पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळेल आणि मलई बंद होईल, अशी टीका ही त्यांनी केली आहे.

आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजाचं ,जनतेचं नुकसान झालं तरी चालेल अशी भूमिका घेणाऱ्या सरकार विरोधात आज भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. या सरकारने पोलीस बळाचा वापर करून आज आम्हाला अटक जरी केली असली तरी समाजाच्या हक्काचा लढा आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे- अशिष शेलार

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More