बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाझेंसोबत सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर, NIA दिलं स्पष्टीकरण

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली गाडी सापडली होती. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं होतं. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यावेळी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. तपासात सचिन वाझे राहत असलेल्या हाॅटेलचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागलं. त्यावेळी त्यांना फुटेजमध्ये वाझेंसोबत एक महिला दिसली होती. ती महिला नेमकी कोण? आणि तिचा सचिन वाझे यांच्याशी काय संबंध? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर आता एनआयएने स्पष्टीकरण दिलं आहे.

सचिन वाझे आणि संबंधित महिलेची 2011 साली भेट झाली होती. सचिन वाझे क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये काम करत असताना त्यांची भेट झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे. पुढे 2013पासून वाझे यांनी या महिलेला भेटण्यास सुरूवात केली. ही महिला शरीरविक्रय म्हणून काम करत होती. ती मीरा रोडमध्ये रहायला असताना सचिन वाझे तिच्या संपर्कात होते. त्यावेळी वाझे यांनी व्यापारी असल्याचं महिलेला सांगितलं होतं. त्यानंतर वाझेंनी तिच्यासोबत व्यावसायिक संबंध प्रस्तापित केले.

या दोघांनी 2016 साली महिलेच्या मुलाच्या नावाने दोन कंपन्या सुरू केल्या. त्यात इलेक्ट्रिक दुचारी भाड्यानं देण्याची कंपनी उभारली. मात्र, ही कंपनी जास्त काळ टिकू शकली नाही. त्यानंतर महिलेने वाझे यांना शरीरविक्री व्यवसायात पैसे लावण्यास सांगितलं. त्यावेळी वाझे यांनी महिलेला कंपनीत संचालक होण्यास सांगितलं होतं.

वाझे यांनी त्यानंतर महिलेला शरीरविक्रीचा व्यवसाय सोडण्यास सांगितलं होतं. त्यावेळी 2017 साली महिलेने कंपनीत तब्बल 17 लाखांची गुंतवणूक केली. अशातच कोरोना काळात व्यवसाय तोट्यात गेला. त्यानंतर 2019 साली वाझे यांनी व्यवसाय पुन्हा सुरू केला. त्यावेळी वाझे यांनी 15 लाख खर्च करून कंपनीसाठी 30 गाड्या खरेदी केल्या होत्या. सचिन वाझे पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर वाझे महिलेला प्रतिमहा 50 हजार रूपये देत होते, असं एनआयएने सांगितलं आहे.

18 ते 20 फेब्रुवारी रोजी महिलेने वाझे यांची पुन्हा भेट घेतली. त्यावेळी तिच्या हातात पैशांनी भरलेली बॅग होती. त्या बॅगेत 40 लाख रूपये होते. त्यातील 36 लाख घेऊन महिला पुन्हा हाॅटेलमधून बाहेर पडताना दिसली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमधून समोर आल्याचं एनआयएने सांगितलं आहे. एनआयएला कंपनीच्या बँक खात्यात 1.5 कोटीची रक्कम सापडली आहे.

दरम्यान वाझे यांना या प्रकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं एनआयने सांगितलं आहे. वाझे यांच्या अटकेनंतर महिलेने बँकेतून 5 लाख रूपये काढले आणि महिला बनारसमध्ये पळून गेल्याचं एनआयएने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

#T20WorldCup| …म्हणून चहलच्या जागी राहुल चहरला मिळाली संधी; निवडकर्त्यांने दिलं स्पष्टीकरण

सुपर लेडी! तालिबानच्या बंदूकधारी दहशतवाद्यासमोर ‘ती’ निडरपणे राहिली उभी

‘तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना…’;निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

धक्कादायक! ज्यांनी एकही लस घेतली नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा

गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More