बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | बॉलिवूड प्रमाणेच हॉलिवूडमध्ये उत्कृष्ट अभिनय करून आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. प्रियांका चोप्राने 2018 साली हॉलिवूड अभिनेता आणि गायक निक जोनस बरोबर विवाह केला होता.

निक जोनस आणि प्रियांका चोप्रा अनेक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही चाहत्यांना त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर नवनविन गोष्टी सांगत असतात. आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रियंका चोप्रानं तिच्यास इंस्टाग्राम अकाऊंटवरून जोनस नाव हटवलं आहे.

प्रियांका चोप्रा तिच्या नावासमोरून जोनस नाव हटवल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. प्रियांका आणि निक जोनस या कपलचा घटस्फोट होणार तर नाही ना?  असे प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहेत.  प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचं 1 डिसेंबर 2018 ला लग्न झालं होतं. निकसोबत विवाह केल्यावर प्रियांकाने इंन्स्टाग्रामवर जोनस नाव लावलं होतं. आता प्रियांकानं तिच्या नावासमोरील जोनस नाव हटवलं आहे.

दरम्यान, निक जोनस आणि प्रियंका चोप्रा यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस लवकरच येत आहे. काही दिवसांपुर्वी प्रियंका चोप्राने निकसोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मी़डियावर अपलोड केले होते. तेव्हा प्रियंका चोप्रा निकसोबत लक्ष्मीपुजन करतानाचे फोटो इंस्टाग्रामवरून पोस्ट केले होते. परदेशातही प्रियंका चोप्राने भारतीय संस्कृती जपल्याने तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच प्रियंकाच्या वर्क बद्दल बोलायचे तर ‘द व्हाईट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसली होती. यानंतर प्रियंका चोप्रा सिटाडेल, जी ले जरा, टेक्ट फॉर यु, यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 थोडक्यात बातम्या- 

‘एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं’; भाजपची खुली ऑफर

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांच्या काळात…”

“गावातली ग्रामपंचायत तरी खडसेंच्या ताब्यात आहे का?”

‘नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार’; चंद्रकांत पाटलांचा दावा

“गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More