बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गांधींचे फोटो आणि पुतळे हटवा; मुंबई पालिका उपायुक्तांचे वादग्रस्त ट्विट

मुंबई | मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. थँक्यू गोडसे, गांधींजींचे फोटो आणि पुतळे हटवा, अशा वादग्रस्त मजकुराचं ट्विट त्यांनी केलं आहे.

महात्मा गांधींचा फोटो नोटांवरुन काढा, गांधींचे नाव असणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था आणि रस्त्यांची नावं बदला, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

चौधरी यांच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चौधरी यांची महापालिकेच्या सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, चौधरी यांनी हे ट्विट डिलिट केलं असून ट्विटमुळे काही लोकांचा गैरसमज झाला आहे. गांधींचा अपमान करण्याचा विचार मी कधीही करु शकत नाही, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-लोकसभेचा निकाल विसरा, आता विधानसभेच्या तयारीला लागा- शरद पवार

-“आजोबा बाळासाहेब विखेंसारखं गप्प बसून काम दाखवू; रोहितची अवस्था पार्थपेक्षा वाईट करू”

-अमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढला

-शरद पवार यांनी आजही ईव्हीएमवर शंका व्यक्त करत भाजपवर केला अतिशय गंभीर आरोप

-राष्ट्रवादी विधानसभेची निवडणूक काँग्रेसोबत लढवणार; तरूणांना देणार अधिकाधिक संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More