Top News नागपूर महाराष्ट्र

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत!

Photo courtesy- Pixabay

नागपूर | राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या संख्येने वाढत चालल्याचं चित्र दिसत आहेत. नागरिकांच्या मनात कोरोनाविषयीची जी भीती सुरूवातीला होती ती भीती आता कमी झालेली दिसत आहे. त्यामुळे नागरिक बिंधास्तपणे विना मास्क फिरत आहेत तर लग्न-समारंभामध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याचे संकेत आपल्या वक्तव्यातून दिले आहेत.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. त्यामध्ये कितीही सांगितलं तरी लोकं ऐकायला तयार नाहीत. विनामास्कचे लोक बाहेर फिरताना दिसत असून ते कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की मास्क लावणं, गर्दी टाळणं हे नियम नागरिकांनी पाळायला हवेत. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं. त्यासोबतच नाईट कर्फ्यूचा विचार चालू आहे मात्र जर लोकांनी स्वत: काळजी नाही घेतली तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असंही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने लोकांमध्ये काही प्रमाणात भीतीचं प्रमाण वाढलं आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही नागरिकांना कोरोनाचे जे नियम दिले आहेत त्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासोबतच जर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीच्या पतीला पाठवला तिचा ‘तो’ व्हिडीओ त्यानंतर…

“आज महाराज असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”

ब्रेकिंग न्यूज- पुण्यासह इतर महापालिका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढवणार

मी कंबर हालवत बसत नाही तर सरळ हाडं तोडते- कंगणा राणाव

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या