महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…
बीड | बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेश काढले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे. तसंच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहतील. हॉटेलमध्ये कोरोना नियमांचं पालन करावं लागेल.
जिल्ह्यातील फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांनी मास्क लावून फळविक्री करावी. जो नियम मोडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापने , दूध विक्रेते दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.
दरम्यान, बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठ्या मनाचा माणूस! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ
मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत राहणार बंद
“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”
धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन
‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये’; सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ
Comments are closed.