बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निकिता तोमर हत्याकांडाचा निकाल; एकाची निर्दोष मुक्तता तर दोघांना दिली ‘ही’ शिक्षा

फरिदाबाद | हरियाणाच्या वल्लभगड येथे 26 ऑक्टोबर 2020 मध्ये महाविद्यालयातून परीक्षा देऊन घरी येत असताना निकिता तोमर या तरूणीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील दोषी तौसीफ आणि रेहानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निकिता ही बी. काॅमच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. महाविद्यालयातून बाहेर येताच तीन जणांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र निकिताने विरोध करताच तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. हत्येचा हा संपूर्ण प्रकार महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. फरीदाबादच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तौसीफ, रिहान आणि अजरुद्दीनला अटक केली होती.

दोषींच्या शिक्षेवर सुनावणी अंतर्गत न्यायाधीश सरजात बासवाना यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने तौसीफ आणि रेहानला भारतीय दंड विधान कलम 302, 34, 120B, 366, 511 अन्वये दोषी ठरवलं आहे. जन्मठेपेच्या शिक्षेसह आरोपींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. फरिदाबाद न्यायालयानं काल दोन्ही आरोपींना दोषी ठरवल्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली. तर, या प्रकरणातील तिसरा आरोपी अजरुद्दीनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, फास्ट ट्रॅक न्यायालयानं 1 ऑक्टोबर 2020 रोजी ट्रायल सुरु केली. या प्रकरणात एकूण 30 सुनावणीमध्ये ट्रायल पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयानं 23 मार्च रोजी आपला निकाल सुरक्षित केला. ट्रायल दरम्यान निकिता तोमरच्या बाजूने 55 आणि प्रतिवादींकडून 2 साक्षिदार हजर करण्यात आले होते. तर, न्यायालयाच्या निकालापूर्वी निकिताचे वडील मुलचंद यांनी न्यायालयाकडून अपेक्षा व्यक्त केली की, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. ज्या प्रकारे एका हिंदू मुलीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा लव्ह-जिहादचा प्रकार आहे. सरकारने निकिताचा योग्य सन्मान केला पाहिजे आणि अशा प्रकरणात विशेष कायदा बनवला पाहिजे. ज्या माध्यमातून अन्य मुलींचा जीव वाचवता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

राहुलचा शतकी तडाखा, भारताचं इंग्लंडला 337 धावांचं आव्हान

‘शिवसेनेनं UPAमध्ये यावं मग त्यांनी व्यासपीठावर आपलं मत मांडावं’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सल्ला

धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!

माझा नाही तर कोणाचाच नाही! संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाऊल

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More