Nikki Tamboli l ‘बिग बॉस मराठी’ चा 5 वा सिझन प्रचंड चर्चेत आहे. या सिझनचा सहावा आठवडा सध्या सुरु आहे. बिग बॉसच्या घरात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अशातच अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या एका वध्रस्ट विधानामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉसचा आज होणाऱ्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये निक्की आणि अरबाज पटेल हे वैभव चव्हाणविषयी बोलताना दिसत आहेत. यावेळी निक्कीने अरबाजशी बोलताना वैभवबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे.
निक्कीचं वादग्रस्त वक्तव्य व्हायरल :
या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निकी अरबाजला म्हणते वैभव तुझ्या आणि माझ्यावर जळतो आहे. एका गोष्टीवरून नाही तर कित्येक गोष्टीवरून त्याला आपल्यासोबत जेलेसी होत आहे. तसेच तुझा राग, गेम जास्त दिसत आहे.
विकेंडमध्ये पण तूझ्याबद्दलच बोलल जात आहे. तसेच तुझी निगेटिव्ह का होईना पण भाऊच्या धक्यावर चर्चा होते. त्यामुळे त्याला त्याची जेलिसी होत आहे. तसेच त्याच्या बद्दल बोलले जात नाही. याशिवाय वैभव फक्त त्याच्या बॉडीमुळे बिग बॉसच्या घरामध्ये दिसत आहे, असं निक्की प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहे. मात्र आता निकी आणि अरबाजचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Nikki Tamboli l निक्की आणि जान्हवीमध्ये मोठा वाद :
याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धकांमध्ये आता दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. अशातच आजच्या भागात नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड लागली उत्सुकता आहे. तसेच आज बिग बॉस मराठीच्या घरात आज भांड्याला भांड पुन्हा एकदा लागणार आहे. निक्की आणि जान्हवीमध्ये जेवण बनवण्यावरून प्रचंड मोठा वाद होणार आहे. निक्कीने घरातील ड्युटी करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. त्यामुळे संपूर्ण घरालाच तिचा प्रचंड राग आलेला दिसून येत आहे
बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, जान्हवी निक्कीवर ओरडते. तुला थोडी तरी लाज वाटत असेल तर मी जेवण बनवलेलं तू जेवणार नाहीस, असं जान्हवी म्हणत आहे. तर माझ्या वाकड्यात गेलं तर मी त्याचा गळाच पकडत असते असं म्हणत निक्की तिला उत्तर देते. मात्र आता ’बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळणार आणि निक्कीच्या अश्या बोलण्याने वैभव काय रिॲक्ट करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
News Title : Nikki Tamboli Viral Video
महत्वाच्या बातम्या-
हरतालिका व्रताच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा, मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद!
‘तू वेळ आणि तारीख सांग, मी…’; ‘हा’ भाजप नेता थेट नितेश राणेंना भिडला
गरोदर महिलांनो या महिन्यात आहे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि तारीख
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद?; शिवसेना नेते दादांवर भडकले
शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरूंना द्या खास शुभेच्छा; शिक्षक होतील खूश