बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळी याचं कोरोनाने निधन

मुंबई | बिग बॉस 14 मधील स्पर्धक आणि अभिनेत्री निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळी याचं नुकतंच निधन झालं आहे. कोरोनामुळे निक्कीच्या भावाचा मृत्यू झाला आहे. जतिन तांबोळी याचं वय 29 वर्ष होतं. मुंबईत त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतू तो अखेर कोरोनाला हरवू शकला नाही आणि मंगळवारी त्याने मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

“मला माहिती नव्हते आज सकाळी देव तुला आमच्यापासून लांब घेऊन जाईल. आम्ही तुझ्यावर प्रचंड प्रेम केलं आणि ते करत राहू. तुझ्या जाण्याने आम्हाला दु:ख झालं आहे. तू एकटा आम्हाला सोडून गेलेला नाहीस. तुझ्यासोबत आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एक भाग देखील गेला आहे. आम्ही तुला पाहू शकत नाही पण तू नेहमी आमच्यासोबत आहेस”, अशी भावनिक पोस्ट निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर लिहली आहे.

20 दिवसांपूर्वीच माझ्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला टीबी आणि कोरोना झाला होता. त्याला न्यूमोनिया देखील झाला होता, असं देखील तिने याआधी सांगितलं होतं. तर काही दिवसांपुर्वीच माझा भाऊ अनेक आजारांशी झुंज देत असल्याचं तिनं सांगितलं.

दरम्यान, निक्की तांबोळीच्या या पोस्टला अनेक कमेंट आल्या आहेत. अनेकांनी तिचं कमेंट करत सांत्वन केलं आहे. त्याचबरोबर तिला धीर देण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.

थोडक्यात बातम्या-

लातुरात अनोखा विवाहसोहळा, ‘या’ कारणामुळं एकच चर्चा सुरु!

“कोरोनाने आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या”

…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख

कोल्हापुरात पावसाचा कहर, आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा आजची आकडेवारी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More