Top News महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाणच्या कुटुंबाला आम्ही भेटू शकत नाही, कारण…- नीलम गोऱ्हे

photo credit- nilam gorhe/facebook

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. त्यासोबतच काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या आहेत. याप्रकरणावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावर आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाणच्या कुटुंबाला आम्ही भेटू शकत नाही. कारण भेटलो तर आम्ही दबाव आणतो की काय? असं वाटेल. पण पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवणाऱ्या सामाजिक संघटना पूजाच्या कुटुंबीयांना जाऊन का भेटल्या नाहीत?, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे आणि पूजा चव्हाण प्रकरणात फरक आहे. मुंडे प्रकरणात तक्रार करणाऱ्यांनी विविध वक्तव्ये केली होती. त्यानंतर आणखी काही माहिती पुढे आली होती, पूजाच्या प्रकरणातही बदनामीचं राजकारण करु नये. न्यायाची कायदेशीर चौकट सांभाळूनच न्याय होईल. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही, असं नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घ्या. याआधीच्या प्रकरणात अशाच व्हायरल माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. या प्रकरणात असं होऊ नये, असंही निलम गोऱ्हे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

“माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये”

‘पूजाने आत्महत्या केली नाही तर…’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!

घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य

“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या