पुणे महाराष्ट्र

“उद्धव ठाकरे यांनी कधीच बाहुबलीचं राजकारण केलं नाही”

पुणे | शिवसेनेला संपवू शकतो असा अनेकांना भ्रम होता, राष्ट्रपती राजवट आण्यासाठी महाराष्ट्रात कशी बेबंदशाही सुरु आहे असं वातावरण निर्माण केलं होतं, त्याला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतपेटीतून चपराक दिली आहे, असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी म्हटलंय.

भाजपच्या विषारी प्रचाराला जनता बळी पडलेली नाही. या निवडणूकीमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपच्या अपप्रचाराला जनतेने उत्तर दिलं आहे, असं म्हणत नीलम गोर्‍हे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

भाजपने शह कटशहाचे राजकारण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवून विषारी प्रचार केला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून निवडून या असं सांगितलं नाही, असं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी म्हटलंय.

ग्रामपंचायतींप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही शिवसेना आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वास नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केलाय.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण…- देवेंद्र फडणवीस

“ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन”

‘या’ गावात सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव!

वादात सापडलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या दिग्दर्शकाने मागितली माफी!

“मी येत्या दोन दिवसांत मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या