Top News पुणे महाराष्ट्र

‘आम्ही नाटक कंपनी असलो तरी…’; निलम गोऱ्हेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

पुणे | औरंगाबादच्या नामांतरावरून विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नाटक कंपनीची उपमा देत शिवसेनेवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकारवर टीका करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यांनी टीका नाही केली तर ते नाटक कंपनीतील एक पात्र आहेत का अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत असल्याचं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. पुण्यात त्या बोलत होत्या.

संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस ठरवून करत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?”

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या ‘या’ वाक्यामुळे आजीने संपवलं आयुष्य

मिर्झापूर फेम गुड्डू भैय्याची लोकप्रियता शिखरावर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या