बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गजा मारणेनंतर पोलिसांची नजर आता पुण्यातील ‘या’ खतरनाक टोळीवर!

पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्याची जंगी मिरवणुक काढण्यात आली होती. दरम्यान या सर्व प्रकरणी गजा मारणेवर गुन्हा दाखल करुन कारवाईदेखील करण्यात आली होती. गजा मारणेनंतर पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळ टोळीवर निशाणा साधला आहे.

निलेश घायवळ याच्या टोळीतील संतोष धुमाळच्या सांगण्यावरून 8 जणांनी एका गॅरेजमधून रॅलीसाठी जीप जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवत पळवुन नेली. कुणाल कंधारे, मुसाबा शेख, अक्षय गोगावले तसेच इतर साथीदार यांनी मिळुन हा गुन्हा केला आहे. दरम्यान या सर्व गुन्हेगारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस सध्या गुंडांविरोधात कारवाई करताना अॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

पुणे पोलिसांनी या संदर्भात तात्काळ कारवाई करत संतोष आनंद धुमाळ (वय 38, रा. भूगाव, ता. मुळशी) आणि मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय 29, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. या जीपचोरी प्रकरणात तक्रारदार व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तो गॅरेजमध्ये काम करत असताना निलेश घायवळ टोळीतील 7 ते 8 लोकांनी येऊन दमदाटी केली आणि चाकुचा धाक दाखवुन गॅरेजमध्ये असलेली जीप चोरून नेली.

सध्या पुणे परिसरात अनेक गुंडांच्या टोळ्या सक्रिय होत आहेत. गजा मारणे याच्यावर झालेल्या कारवाईनंतर गुंडावर पोलिसांचा वचक राहील असं वाटत असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भितीचं वातावरण दिसत आहे. पुणे पोलिसही अशा घटना घडु नये यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

“चुकीचं काम केल्यास शिक्षा व्हायलाचं हवी, मगं चुकी करणारे उदयनराजे का असेना”

‘राज ठाकरेंना कोरोना झाला तर…’; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची राज यांच्यावर टीका

‘द चॅनेल 1’नं मारली बाजी; मराठी भाषेतलं पहिलं ओटीटी व्यासपीठ सुर

प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More