बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘या’ बड्या गुंडाला घरात घुसून ठोकल्या बेड्या!

पुणे | कुख्यात गुंड गजा मारणे कारागृहातूनबाहेर पडल्यावर त्याने काढलेल्या रॅलीमुळे पोलिसांवर टीका झाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यातील कुख्यात गुंडांना जणू गजाआड करण्याचा पण घेतला आहे. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड निलेश घायवळला त्याच्या घरात घुसून बेड्या ठोकल्याची माहिती समजत आहे. सध्या गजा मारणे आणि शरद मोहोळ बाहेर आल्याने पुन्हा एकदा पुण्यात टोळीयुद्ध होँणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिसांनी हिट लिस्टवर असलेल्या घायवळला अटक केल्याने पुण्यातील इतर भाईंचेही धाबे दणाणले असतील.

भिगवण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोेलिसांनी निलेश घायवळला त्याच्या गावी म्हणजे सोनेगाव ता. जामखेड जि. नगर जात त्याचा घरात बेड्या ठोकल्या आहेत. निलेश घायवळला अटक करताना भिगवण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय गोपनीय आणि चाणाक्षपणे त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी याबाबात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

गजा मारणेने बाहेर आल्यावर रॅली काढत पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यावर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होताी. गजा मारणेने फक्त रॅलीच काढली नाही तर त्या रॅलीनंतर त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. तो फरार घोषित असताना त्याने वडगाव मावळच्या न्यायालयात जाऊन अटकपुर्व जामीन मिळवत णे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गजाला सळो की पळो करून सोडलं आणि इतर कुख्यात गुंडावर कारवाई करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, भिगवण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणीचा गुन्हा झाला होता. त्यानंतर ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण

कोरोना व्हायरस म्हणतोय ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – उद्धव ठाकरे

“गुजरातमधील दंगल चुकीची होती हे नरेंद्र मोदींनी मान्य करावं”

ट्विटवर ट्रेंड होतोय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे किस्सा?

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More