बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं- जयंत पाटील

पारनेर | पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारलं आहे. या कोविड सेंटरला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी जयंत पाटलांनी निलेश लंके यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतलं आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवलं. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पवारसाहेब सामान्यांसाठी धावून जातात. त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत, अशा शब्दात जयंत पाटील यांनी निलेश लंके यांचं कौतुक केलं आहे.

आज कोविड सेंटर पाहिल्याने लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा ‘पण’ त्यांनी घेतला आहे. 14 एप्रिलपासून झोकून काम करत आहेत. लोकांचा आदर्श म्हणून ते उभं राहिलं आहेत. निलेश लंके यांनी महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, निलेश लंके यांनी पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने लंकेही भावूक झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच भाजपच्या आमदार श्वेता महाले या सुद्धा पारनेरला आल्या होत्या. त्यांनी या कोविड सेंटरची पाहणी केली होती.

थोडक्यात बातम्या- 

कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च टाटा उचलणार

“वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात अतिदिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोना लस; प्रशासनाचा स्तुत्य निर्णय

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More