बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

अहमदनगर | कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलं आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासन कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. पण तरी देखील कोरोनाचा फैलाव वाढतानाच दिसत आहे. कोरोनामध्ये लोकांचे होत असलेले हाल पाहता आता लोकप्रतिनिधी देखील मदत करण्यास पुढे येत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांंचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोरोनाची वाढती संख्या पाहता निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने तब्बल 1100 बेड्सचे कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारले आहे. त्यांच्या या कामाची महाराष्ट्राभरात चर्चा झाली होती. लंके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये जेवणाची तसेच उपचाराची सोय आहे. हे सेंटर उभारण्यासाठी लंके यांनी खूप मेहनत देखील घेतली होती. आता पुन्हा एकदा निलेश लंके चर्चेचा विषय ठरले आहेत.

निलेश लंके यांंचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये निलेश लंके कोणताही बडेजाव न मिरवता गरीब आणि सामान्य लोकांमध्ये झोपल्याचं दिसत आहेत. अंगावर काहीही नसताना ते शांतपणे जमिनीवर झोपताना दिसत आहेत. हा फोटो कोविड सेंटरमधला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील झोपलेले दिसत आहेत.

दरम्यान, आमदार निलेश लंके यांंनी अहमदनगरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. खुद्द शरद पवारांनी निलेश लंके यांच्या कामाची दखल घेतली होती.

थोडक्यात बातम्या-

एकाच तरुणीवर दोन गुंडांचं जडलं प्रेम, तरुणीने नकार दिल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील सर्व महत्त्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

“370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षणाबाबत दाखवा”

कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका, सरकार तुमच्यासोबत आहे- उद्धव ठाकरे

मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की…- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More