Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी मात्र इंग्रजीतून शपथ घेतली.त्यांच्या या अनोख्या स्टाईलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
आता निलेश लंकेचा सध्या एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी एकत्र दिसून येत आहेत. यात नितीन गडकरी यांनी निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो आता चर्चेत आला आहे.
निलेश लंके यांचं ट्वीट चर्चेत
आज अधिवेशनानंतर खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. कोरोना काळात निलेश लंके यांच्या कामाचे भरपूर कौतुक झाले होते. तसेच रस्त्यासाठी जेव्हा लंके उपोषणाला बसले होते, तेव्हा नितीन गडकरी यांनी स्वत: त्यांना फोन केला होता.अशात ही दिल्लीतील भेट आता चर्चेत आली आहे.
“देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते!”, असं ट्वीट करत लंके (Nilesh Lanke) यांनी गडकरी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केलाय.
देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते! pic.twitter.com/2YXk2zHpkR
— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) June 26, 2024
निलेश लंके आणि नितीन गडकरी यांची भेट
दरम्यान, दिल्लीत सध्या 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. तर, आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड झाली. कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेत्यापदी निवड झाली आहे.
News Title – Nilesh Lanke and Nitin Gadkari meet in Delhi
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना
“शिंदे-फडणवीसांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, राज्यातले उद्योग गुजरातला पळवले”
मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी देखील पायी वारीत सहभागी होणार?
“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”