Nilesh Lanke | लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपाचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली.या लढतीत निलेश लंके यांचा विजय झाला. निवडणूक प्रचारात लंके आणि सुजय विखे यांनी एकमेकांवर बरेच आरोप केले होते.
अशात खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियाबाबत बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय. ‘विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहे’, असं लंके म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची आता एकच चर्चा होते आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश लंके?
“लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आता लागला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता बोलणं योग्य नाही. झालं गेलं सोडून द्यायचं. विखे कुटुंबिय हे जिल्ह्यात मोठं कुटुंबिय आहे. त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं नाव आहे. निवडणुकीत बोललं नसतं तर उमेदवार काहीच बोलत नाही, असं म्हटलं गेलं असतं. पण, आता निवडणुका झाल्या आहेत. प्रचारात माझ्याकडून एखादा शब्द घसरला असेल किंवा त्यांचा माझ्यावर घसरला असेल. मग आता तेच मनावर घेऊन बसायचं का?”, असं निलेश लंके (Nilesh Lanke ) म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी केला, हे मी अभिमानाने सांगतो. या गोष्टीचा मलाही अभिमान आहे. राज्याचे महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत. हा अभिमान आपण सांगितला पाहिजे.”, असंही लंके म्हणाले आहेत.
“आपण लहान माणसांनी लहान माणसासारखं वागलं पाहिजे”
“जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. जिल्हा नियोजन समितीची असली की मी सुद्धा त्यांना सांगेल की मला आशीर्वाद द्या. मीही त्यांच्याकडे एखादे काम घेऊन जावू जाईल. मी हक्काने त्यांना बोलू शकतो. आपण लहान माणसांनी लहान माणसासारखं वागलं पाहिजे”, असं निलेश लंके यावेळी म्हणाले आहेत.
निवडणुकीमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. विखे पाटील यांनी तर इंग्रजी भाषेवरून देखील लंके यांना डिवचलं होतं. मात्र, निवडणूक झाल्यानंतर लंके (Nilesh Lanke ) यांनी प्रथमच विखे कुटुंबियांचं कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
News Title – Nilesh Lanke Appreciation To Minister Radhakrishna Vikhe Patil
महत्त्वाच्या बातम्या-
रिल स्टार ‘माऊ’ घरातून अचानक गायब; सुसाईड नोट सापडल्याने खळबळ
भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ; ‘या’ माजी खेळाडूने संपवलं जीवन
Google Chrome वापरणाऱ्यांना सरकारचा अलर्ट, ‘या’ मोठ्या धोक्यापासून केलं सावध
“40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचं कमोड..”; आलिशान पॅलेसमुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अडचणीत
सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…