Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटलांचा पराभव केला आहे. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत अत्यंत चुरशीची झाली.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या.
“मी आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत..”
मात्र, नगरमध्ये राजकीय मैदान शरद पवारांच्या या शिलेदारानेच गाजवलं. अशात लंके यांनी निवडणुकीततील जुने मुद्दे समोर आणत विखे पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलून दाखावे, असे चॅलेंज करून विखेंनी लंके यांना टार्गेट केलं होतं.
याला आता निलेश लंके यांनी खासदार होताच प्रत्युत्तर दिलंय.लंकेंनी खास शैलीत विखेंना सुनावले आहे.’मी आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत फडाफडा बोलत असतो,’ अशा शब्दांत लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे यांना सुनावलं आहे.
नगरमध्ये निवडणूक प्रचारात इंग्रजी भाषेचा मुद्दा खूप गाजला. प्रचारात विखे-लंके यांच्यात इंग्रजीवरुन कलगीतुरा रंगला होता.आता निलेश लंकेंनी विजयाचा गुलाल उधळताच विखेंना सुनावलं आहे. आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार असल्याचे लंके म्हणाले आहेत.
सुजय विखे नेमकं काय म्हणाले होते?
“निलेश लंके यांनी माझ्यासारखी इंग्रजी बोलून दाखवली तर मी लोकसभेचा अर्ज भरणार नाही. माझा अर्ज भरण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे. हवं तर त्यांनी पाठांतर करून इंग्रजी बोलावं.”, असं आवाहनआव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं होतं. त्यालाच खासदार झाल्यावर लंके (Nilesh Lanke) यांनी प्रत्युत्तर दिलं.
News Title – Nilesh Lanke Big announcement
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानापदाचा राजीनामा
आशिष शेलार पडले तोंडावर, किरण मानेंनी व्हिडीओ शेअर करत डिवचलं
राज्यात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
INDIA आघाडीत सहभागी होणार?, चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
“काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका”