अहमदनगर | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेर मतदारसंघातील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शिनसेनेला हा अतिशय मोठा धक्का मानण्यात येत आहे.
मी शिवसेनेचं 20 वर्षापासून एकनिष्ठ, 15 वर्षे तालुकाध्यक्ष, अडीच वर्षे पंचायत समिती उपसभापती, नियोजन समितीवर काम केलं. पक्षवाढीस काम करुनही मला बडतर्फ केलं, असा आरोप लंके यांनी केला आहे.
मला पक्षातून काढून टाकले म्हणून शिवसेनेच्या विरोधात औटींना शह देण्याचा मी विडा उचलला आहे, असंही लंके यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आज पारनेरच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या-
–विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून?, धनंजय मुंडेंनी दिले संकेत
–माझ्या अंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, तर दानवेंचा पराभव होणारच!
–हिंदू महासभेची वेबसाईट हॅक; केरला सायबर वॉरिअर्सनं घेतला बदला
–काय ‘भावना’ कसं आहे?, पाहा मोदींच्या प्रश्नावर काय म्हणाल्या शिवसेना खासदार…
–स्मारक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे छापे; मायावतींच्या अडचणीत वाढ?