कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीवर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Nilesh Lanke | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली. यानंतर निलेश लंकेंचे (Nilesh Lanke) गजा मारणेसोबतचे फोटो व्हायरल झाले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

कुख्यात गुंड गजा मारणे अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंच्या भेटीला गेला होता. यानंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. लंकेची गजा मारणेंसोबत झालेली भेट ही निलेश लंकेंना (Nilesh Lanke) अडचणीत आणत आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. यावेळी गजा मारणेनं निलेश लंकेा सत्कार केला. मात्र आता तोच सत्कार निलेश लंकेंच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहे.

निलेश लंकेंची प्रतिक्रिया

निलेश लंके हे गजा मारणेच्या भेटीस गेले होते. तेव्हा निलेश लंकेंचा सत्कार केला. मात्र निलेश लंके आणि गजा मारणेच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर आता निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गजा मारणेसोबत झालेली भेट ही केवळ एक अपघात होता. मला गजा मारणे याची पार्श्वभूमी माहिती नाही. त्यानंतर निलेश लंके यांनी अमोल मिटकरींना देखील सुनावलं आहे. ते म्हणाले की त्यांनी अमोल मिटकरींना केवळ मीडियासमोर बोलायला ठेवलं आहे.

अमोल मिटकरींची निलेश लंकेंवर टीका

शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीत मदत केल्याप्रकरणी आभार मानण्यासाठी होती का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय. गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का?, असा सवालही मिटकरींनी केला.

पार्थ पवारांनी मारणेेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानउघडणीसारखी लंकेंचीही कानउघडणी पवार गट करणार का?, असा सवाल त्यांनी केलाय.

पुणे शहरातील गुन्हेगारीतील एक मोठं नाव कुख्यात गुंड गजा मारणे आहे. गजानन मारणेंचं मुळ गाव हे मुळशी तालुक्यातील आहे. मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गुंड गजानन मारणेची ओळख आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पप्पू गावडे आणि अमोल बुधेंच्या खूनप्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षा दिली होती. त्यानंतर गजा मारणे हा पुण्यातील येरवडा येथील कारागृहात राहत होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

News Title – Nilesh Lanke Meet With Pune Gangster Gaja Marne After Amol Mitkari Statement

महत्त्वाच्या बातम्या

रोज सेक्स करणं चांगलं आहे का?, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या

विद्या बालनच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा!

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस धो-धो बरसणार

भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक बाजारात लाँच; किंमत काय असणार?