निलेश लंके वादात अडकणार?; कुख्यात गुंड गजा मारणेची भेट स्वीकारली

Nilesh Lanke |  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंकेंचा (Nilesh Lanke) कुख्यात गुंड गजा मारणेसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसला आहे.

निलेश लंके आणि कुख्यात गुंड गजा मारणे भेट

निलेश लंके (Nilesh Lanke) हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आहे. त्यांनी पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेसोबत  सत्कार स्विकारला आहे. यामुळे आता यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांना देखील खडसावलं होतं. पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेणं हे अजित पवारांना आवडलं नसल्याने अजित पवार यांनी पार्थ पवारांना सुनावलं होतं.

कोण आहे गजा मारणे?

पुणे शहरातील गुन्हेगारीतील एक मोठं नाव कुख्यात गुंड गजा मारणे आहे. गजानन मारणेंचं मुळ गाव हे मुळशी तालुक्यातील आहे. मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गुंड गजानन मारणेची ओळख आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पप्पू गावडे आणि अमोल बुधेंच्या खूनप्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षा दिली होती. त्यानंतर गजा मारणे हा पुण्यातील येरवडा येथील कारागृहात राहत होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

News Title – Nilesh Lanke Meet With Pune Gangster Gajanan Marne Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

“SIT खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या..”; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांचा टोला

“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार

अजित पवार ‘या’ घोटाळ्यामुळे पुन्हा अडचणीत सापडणार?

शेतकऱ्यांनो यापुढे कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरविणार, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?

राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज!