Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. निलेश लंके यांनी डॉ.सुजय विखे पाटलांचा पराभव करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नगरमध्ये लंके विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत अत्यंत चुरशीची झाली.
अहमदनगरमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र, येथे बाजी शरद पवारांच्या शिलेदारानेच मारली.
निलेश लंकेंच्या आईचे गंभीर आरोप
या निकालानंतर लंकेंच्या आईंनी धक्कादायक आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना लंके यांच्या आईने खळबळजनक खुलासे केले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून मोठी पूजा घातल्याचं लंके (Nilesh Lanke) यांच्या आईने म्हटलं आहे.
“निवडणूक काळात हे मोठे लोक मशीन मध्ये घोटाळा करू शकतात अशी चर्चा होती. हेच नाही तर, कुठे अपघात व्हावा यासाठी मोठ मोठ्या पूजा घालण्यात आल्या.”, असा खळबळजनक आरोप देखील लंके यांच्या आई शकुंतला लंके यांनी केला आहे.
निलेश लंके यांचा नगरमध्ये दणदणीत विजय
निलेश लंके यांच्या आईच्या आरोपांमुळे सध्या एकच चर्चा रंगली आहे. त्यांनी हे आरोप करताना कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र, राजकीय वर्तुळात सध्या याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. त्यांनी नेमका कुणावर हा आरोप केला, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
दरम्यान, अहमदनगर येथे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे-पाटील यांच्याच अटीतटीची लढाई सुरू होती. अखेर लंके (Nilesh Lanke) यांनी विजयाचा गुलाल उधळला.
News Title – Nilesh Lanke mother Serious allegations
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुण्यातील ‘या’ भागात पूरसदृश्य पाऊस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी! फडणवीसांनंतर ‘या’ नेत्यानेही घेतला मोठा निर्णय
“देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई, पक्ष फोडणारा खलनायक”
पराभवानंतर पंकजा मुंडेंची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाल्या…
ड्रीम गर्ल ते ड्रामा क्वीन..’या’ बॉलीवुड कलाकारांनी राजकीय मैदानही गाजवलं