Nilesh Lanke | नगरमधील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी लंके यांना थेट इशाराच दिला होता. याला आता लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
‘माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन.’, असं अजित पवार म्हणाले होते. यालाच निलेश लंके यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
निलेश लंकेंचं जशास तसं उत्तर
“दादांना मी फोन करून विचारणार आहे. दोन दिवस थांबा, निवडणुका होऊ द्या, मग पाहू. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती त्यामुळे ते बोलले असतील. आपण एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असतो तेव्हा त्याच्याबाबतीत सकारात्मक बोलणे अपेक्षित असते”, असं निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) म्हटलं आहे.
पुढे लंके यांनी सुजय विखे यांच्यावरही निशाणा साधला. “मोदींच्या नावावर मत मागण्यापेक्षा स्वतःच्या कामावर मत मागणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही म्हणजे त्यांना त्यांचे अपयश दिसून आले आहे. ज्या वेळेस माणूस दुसर्याचा आधार घेतो त्यावेळेस आपल्याकडे काही राहिलेले नसते.”,असा टोला त्यांनी यावेळी सुजय विखे पाटलांना लगावला आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है?, असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इशारा दिला होता. ‘अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला फक्त अजित पवारच दिसतील.’, अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला होता.
“आता तो आमदार नाही. त्यामुळे त्याची अरेरावी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नये. कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका. निवडणूक आयोगाला सुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत”, असंही अजित पवार म्हणाले होते.
News Title – Nilesh Lanke on Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”
नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?
नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार
रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन
अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत