Police Bharti l कित्येक दिवसांपासून तरुणवर्ग पोलीस भरतीची वाट पाहत होते. अशातच उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. या पोलीस भरती प्रक्रिये अंतर्गत 17 हजार 471 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहेत.
पोलीस भरती पुढे ढकलावी :
मात्र राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. कारण राज्यात सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कारण पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भरती प्रक्रियापुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरु होणारी पोलीस भरती पावसामुळे पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. कारण सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. पावसामुळे येण्या जाण्यासाठी काही प्रमाणात अडचणी देखील येऊ शकतात. त्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.
Police Bharti l राज्यात उद्यापासून पोलीस भरती होणार सुरु :
19 जून 2024 पासून म्हणजेच उद्यापासून राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. या पोलीस भरतीसाठी राज्यातून तब्बल 17 हजार 471 जागा भरल्या जाणार आहेत. मात्र त्यासाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस विभागातील पोलीस शिपाई, बँड पथक आणि चालक पदासाठी उद्या पहाटे पाच वाजल्यापासून पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी तब्बल 500 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. यामध्ये जिल्हा पोलीस दलातील शिपाई 25, तर चालकाच्या 39 जागा रिक्त भरण्यात येणार आहेत. तसेच यामधील पोलीस शिपाई पदासाठीच्या 25 जागांपैकी तीन जागा बैंड पथकासाठी राखीव असणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
News Title –Nilesh Lanke on Maharashtra Police Bharti
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आज बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये
उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?
या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो
राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
‘हा’ बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राज्याच्या राजकारणात खळबळ