“बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात”

अहमदनगर | बच्चू भाऊ, या सरकारमध्ये काही दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात… शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे तुम्ही नेते आहात, असं म्हणत पारनेर तालुक्यातील युवानेते निलेश लंके यांनी आमदार बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे.

निघोज येथे शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या जंगलमोती शेतकरी उत्पादन कंपनीच्या कार्यक्रमात लंके बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची उपस्थिती होती.

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मी पाहत आहे. येथील नेते फक्त मोठ्या गोष्टी करतात, करत मात्र काही नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही समाजात काम करण्यास सज्ज झालो आहोत, त्यांचा आदर्श समोर ठेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला की मोदी घरात बसणं पसंत करतात- राहुल गांधी

-“बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो”

-गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे गुजरात ठरले पहिले राज्य

-अंबाती रायडूच्या बॉलिंग अ‌ॅ‌‌‌‌‌‌‌‌‌‌क्शनवर पंचांनी उपस्थित केले प्रश्न ‌

-एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

Google+ Linkedin