निलेश लंके यांचा अत्यंत खळबळजनक आरोप!

Nilesh Lanke | पाचव्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं. अंतिम निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र निकाल लागण्याआधीच दक्षिण लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमला छेडछाड केल्याचा धक्कादायक आरोप निलेश लंके यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ  (Nilesh Lanke) ट्विट केला आहे.

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन हे एका स्ट्राँग रूममध्ये ठेवले जातात. त्याला कडेकोट बंदोबस्त असतो. सुरक्षा रक्षक तैनात असतात. अशा ईव्हीएम असलेल्या स्टाँगरूममध्ये एका व्यक्तीने ईव्हीएम मशीनला काहीतरी छेडखानी केल्याचा व्हिडीओ आता निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये कुंपणच शेण खात असून लोकशाहीची चोरी करण्यात येत आहे, असा हल्लाबोल निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला आहे.

निलेश लंके यांचं ट्विट

निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतंय,”

दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान दोन्ही उमेदवार हे तगडे होते. मतदारांनी नेमका कोणाला मतदानाचा कौल दिला आहे हे येत्या 4 जून रोजी समजेल.

बारामती आणि सातारा लोकसभा मतदारसंघात हिच परिस्थिती

बारामती लोकसभा मतदान हे तिसऱ्या टप्प्यात पार पडलं होतं. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे देखील तिसऱ्या टप्प्यात पार पडलं होतं. अशातच आता दोन्ही मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममधील सीसीटीव्ही फूटेज बंद असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात लोकशाहीवर गदा आणण्याचं काम सत्ताधारी करत आहेत का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातही ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूममध्ये अर्धा तास सीसीटीव्ही बंद असल्याचं समजलं.

दरम्यान बारामती निवडणूक आयोगाच्या अधिकारी कविता द्विवेदी यांनी तांत्रिक बाबींमुळे सीसीटीव्ही बंद करण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्याचे फूटेज उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. मात्र यावर ते फूटेज हे त्याच मतदारसंघातील ईव्हीएम मशीनच्या स्ट्राँगरूममधीलच आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

News Title – Nilesh Lanke Share Viral Video About EVM Strong Room Nagar Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ

पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

‘माझ्या मुलाने असं काही केलं असतं तरी…’; पुण्यातील अपघातावर अजित पवार स्पष्टच बोलले