निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ; पाहा Video

Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी काल (24 जून) लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी मात्र इंग्रजीतून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत इंग्रजी भाषेचा मुद्दा प्रचंड गाजला होता.

अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला होता. मात्र, प्रचार दरम्यान सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात बरंच शाब्दिक युद्ध झालं. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते.

निलेश लंके यांनी घेतली खासदारकीची शपथ

मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हानच विखे पाटील यांनी दिलं होतं. या आव्हानाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. याला इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असं प्रत्युत्तर लंके (Nilesh Lanke) यांनी दिलं होतं.

सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातील शाब्दिक वाद

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लंके म्हणाले होते की, मी आता थेट संसदेत जाऊन फडाफडा इंग्रजी बोलत असतो आणि काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लंके यांनी थेट इंग्रजीतून शपथ घेतली. याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. इंग्रजीतून बोलून लंके यांनी अप्रत्यक्षपणे विखे पाटलांना एकप्रकारे टोलाच लगावला आहे.

दरम्यान, नगरमध्ये लंके (Nilesh Lanke) यांच्या विजयावर सुजय विखे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.

News Title – Nilesh Lanke takes oath in english language

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादांच्या आमदारांना पक्षात घेणार का? शरद पवारांना सवाल; उत्तर ऐकून चिंतेत पडालं

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! दोन दिवस भरती, ओहोटीचं सावट

राहुल गांधी एनडीएला पाठिंबा देणार? मात्र घातली ‘ही’ अट

पोर्शे कार अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय!

सावधान! राज्यात फोफावतोय ‘हा’ संसर्गजन्य आजार; वेळीच काळजी घ्या