अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना सणसणीत टोला, पाहा Video

Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत अत्यंत चुरशीची झाली. मात्र, निवडणुकीच्या काळात सुजय विखे यांनी लंके यांना इंग्रजी भाषेवरून चांगलंच डिवचलं होतं.

लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलून दाखवावे, असं चॅलेंज करून विखेंनी लंके यांना टार्गेट केलं होतं. त्याला खासदार झाल्यानंतर लगेच लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. ’मी आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत फडाफडा बोलत असतो,’ अशा शब्दांत लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे यांना सुनावलं होतं.

‘पवार इज पावर’

तर, आज अहमदनगर येथे निलेश लंके यांनी इंग्रजीतून बोलूनही दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन सोहळा यंदा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात बोलत असताना लंके यांनी इंग्रजीतून बोलून दाखवलं.

“सगळ्यांनी एकच ध्यानात ठेवायचं, ‘पवार इज पावर’ सगळ्यांचा नाद करायचा पण, शरद पवारांचा करायचा नाही. त्यांचा नाद केला ना तर भल्या-भल्यांना ते घरी पाठवत असतात.”, अशी फटकेबाजी यावेळी लंके (Nilesh Lanke)यांनी केली. इंग्रजीतून बोलून त्यांनी यावेळी सुजय विखे यांना देखील टोला लगावला.

“..तर संसदच बंद पाडतो”

आज इंग्रजी वाक्य बोलून निलेश लंकेंनी थेट सुजय विखेंवर निशाणा साधला. कारण, सुजय विखेंनी निवडणूक प्रचारादरम्यान लंकेंवर टीका करताना, त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्यावरुन खिल्ली उडवली होती. संसदेत जायचं म्हटल्यावर इंग्रजी बोलता आलं पाहिजे, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे हा मुद्दा तेव्हा निवडणुकीत चांगलाच गाजला होता.

पुढे बोलताना, “मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का ? पण साहेबांमुळे खासदार झालो. तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संसद बंद पाडतो, आमचं काम हटके आहे. एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर आहे.”, असंही निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत.

News Title – Nilesh Lanke Target Sujay Vikhe

महत्त्वाच्या बातम्या-

“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन!

शेतकऱ्यांनो पेरणी करण्यापुर्वी ही बातमी वाचाच!, नाहीतर बसेल मोठा फटका

‘सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे’, सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवला समस्यांचा पाढा