श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल

अहमदनगर |श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात निलेश म्हसे यानं याचिका दाखल केली आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आला आहे. 

याचिकेत छिंदमची निवड रद्द करण्याची मागणी निलेश म्हसे यानं केली आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

या कारणानं त्याला तडीपार करण्यात आलं होतं. मंगळवारी तडीपारीची मुदत संपल्यावर तो अहमदनगरला परत आला आहे. 

दरम्यान, छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले होते.

महत्वाच्या बातम्या 

-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस

-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”