Top News महाराष्ट्र मुंबई

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल

मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र शेख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात असल्याचं सांगितलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी थेट पवारांना सवाल केला आहे.

मी पीडित मुलीला ओळखतच नाही सांगणाऱ्याची 1 वर्ष जुनी ओळख पोलिसांनीच बाहेर काढली तरी आरोपी मोकाट आहे. पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?, असा सवाल निलेश राणेंनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना केला आहे.

राष्ट्रवादीसाठी नवीन प्रकारची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आरोपीवर गुन्हा नोंदवला गेला असून सुद्धा, ‘तो मी नाही’ ऐकून पोलीस गप्प बसले, असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या प्रकरणावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मॅच फिक्सिंगच्या बंदीनंतर ‘या’ भारतीय खेळाडूची तब्बल 7 वर्षांनंतर संघात निवड!

“आता बघू… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की संभाजी राजेंचा स्वाभिमान की मुख्यमंत्री पदाची खुर्ची”

“औरंगाबादचं संभाजीनगर करणं झेपलं नाही पण ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे यशस्वीपणे केलं”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे कोरोना पॉझिटीव्ह

तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या