बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार साहेबांनी नाना पटोलेंना तर पान टपरीवालाच करून टाकला”

मुंबई | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोले हे लहान असल्याचं म्हणत त्यांना चिमटा काढला.

या सर्व प्रकरणात भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्यावर घणाघात केला आहे. ‘शरद पवार साहेबांनी आता कुठे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत स्वतःला बघणाऱ्या नाना पटोलेंना तर पान टपरीवालाचं करून टाकलं’, असं ट्विट करत निलेश राणे यांनी नाना पटोलेंसह शरद पवारांना चिमटा काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

‘कधी कधी असं वाटतं की, पवार साहेब तुम्ही काही लोकांची लायकी बरोबर ओळखता’,  असं म्हणत निलेश राणे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरुन चांगलीच टीका केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे  त्यातच नाना पटोले या सर्व प्रकरणात नेमके काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या सर्व प्रकरणात विरोधी पक्ष भाजपच्या नेत्याकडून होत असलेल्या टीकेला महाविकास आघाडी सरकारकडून नेमक कसं प्रत्‍युत्तर मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु, उघडपणे चाललेल्या या शाब्दिक चकमकीमुळे महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी चव्हाट्यावर येत आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More