बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे’; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई | ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात महिलांवर अत्याचार करत असल्याचे आरोप होत आहेत. सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर वनमंत्री संजय राठोड आणि आता थेट मातोश्रीची ढाल असणारे संजय राऊत यांच्याविरोधात महिलेचा छळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर भाजप सचिव निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

ठाकरे सरकार मध्ये सगळेच रणजीत आहेत. जुन्या पिक्चर मध्ये जेव्हा अभिनेता रंजीत पिक्चर मध्ये एंट्री करायचा तेव्हा सगळ्यांना माहित असायचं हा कुठल्या तरी महिलेवर अत्याचार करणार तशीच ठाकरे सरकारबद्दल लोकांची समज झाली आहे. महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे. असं ट्विट करत निलेश राणेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मागील सात वर्षांपासून संजय राऊत आपला छळ करत असल्याची याचिका एका उच्च शिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली आहेत, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं असे अनेक गंभीर आरोप या महिलेने संजय राऊत यांच्यावर केले आहेत. याप्रकरणात महिलेने राऊतांच्या विरोधात काही वर्षांपूर्वी आपल्यावर जिवघेना हल्ला घडवून आणल्याची तक्रार देखील मुंबई पोलिसांकडे दाखल केली होती.

दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी सुद्धा बॉलिवूडमधील ‘दीवार’ चित्रपटाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. संजय राठोड आणि आदित्य ठाकरेंचा ‘दीवार’ चित्रपटाशी मिळता जुळता संवाद ट्विट करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘मला ‘या’ दिवशी एक दिवसाचा मुख्यमंत्री करा’; अभिजित बिचुकलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले….

ठाकरे सरकारमधील धनंजय मुंडे, राठोड यांच्यानंतर आता संजय राऊतांवर आरोप

अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी

मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More