बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निलेश राणे आणि संजय काकडेंनी तब्बल इतक्या लाखांची पाणीपट्टी थकवली, पुणे महापालिकेने धाडली नोटीस

पुणे | भाजप नेते निलेश राणे आणि संजय काकडेंनी यांनी पुणे महापालिकेची 83 लाखांची पाणीपट्टी थकवली आहे. यामध्ये निलेश राणेंची 17 लाख आणि 66 लाख रूपये पाणीपट्टी थकवली आहे. पुणे महापालिकेने एकूण 200 कोटी रूपयांची पाणीपट्टी थकवणाऱ्या 856 जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर सांगितली आहेत. महापालिकेने सर्व थकबाकीदारांना नोटीस धाडली आहे.

भाजपचे माजी खासदार निलेश राणे आणि संजय काकडे यांचा समावेश आहे. त्यासोबतच नामांकित आणि त्यांच्याशी संबधित इमारतींसह संस्थांचा समावेश असल्याची माहिती आहे. खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनच्या थकबाकीने दोनशे कोटींचा आकडा गाठला आहे. 200 कोटीच्या आकडेवारीमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्यांची संख्या आहे 86 आणि थकीत रक्कम आहे 22 कोटी आहे.

10 लाख ते 1 कोटी दरम्यान रक्कम थकित असलेल्यांची संख्या आहे 254 आणि थकीत रक्कम आहे 58 कोटी 81 लाख आहे. पाच लाख ते दहा लाख रक्कम थकित असलेल्यांची संख्या आहे 1027 यांनी थकीत रक्कम आहे 60 कोटी रुपये. तीन लाख ते पाच लाख रक्कम थकित असणाऱ्यांची संख्या आहे 1336 आणि थकीत रक्कम 52 कोटी 15 लाख इतकी आहे.

दरम्यान, या यादीमध्ये मोठी नाव आहेत. यामध्ये निलेश राणे, संजय काकडे आणि पोलीस आयुक्तालय आणि इतर इमारती, पोलीस महासंचालक सी आय डी, पुण्यातील नामवंत महाविद्यालय फर्ग्युसन कॉलेज आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे लाखो रूपये थकीत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं

‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल

‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा

“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे

“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More