“… त्या बरोबर म्हणाल्या, आदित्य ठाकरे हा महाराष्ट्राचा पप्पूू आहे”
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन शिवसेना पक्ष फोडल्यानंतर शिवसेनेवर भाजप (BJP) पक्ष आणि त्यांचे नेते सतत आरोप करत आहेत तर कधी त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. राणे पिता-पुत्र तर बंडाच्या दिवसापासूनच शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका आणि आरोप करण्यात कुठेच कमी पडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. आज तक वृत्त वाहिनीच्या अँकर अंजना कश्यप (Anjana Kashyap) बरोबर बोलल्या होत्या, आदित्य हा महाराष्ट्राचा पप्पू (Pappu) आहे. उद्धव ठाकरे यांनी वडिलांचा 90% पक्ष संपविला. आदित्यने ठरविले की, उरलेले 10% मी संपविणार प्लीज, असे ट्विट राणे यांनी केले आहे.
काही क्षणांपूर्वी एकाच पक्षात एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसणारे नेते पुढच्या क्षणाला पक्षांतर करतात. तसेच काहीसं आदित्य ठाकरे यांच्यासोबत घडले. आदित्य ठाकरे यांनी सोमवारपासून राज्यदौरा सुरु केला. त्यात त्यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली. संवादाच्या पहिल्या टप्प्यावर ते काल (दि. 21) भिवंडीत होते. यावेळी त्यांनी खुमासदार भाषण ठोकत एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर टीका केली.
दरम्यान, त्यांची सभा संपली आणि त्यांच्या आक्रमक भाषणानंतर काही तासांतच भिवंडीतील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शविला. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिवसेनेतील या गळतीवरूनच निलेश राणेेंनी हल्लाबोल केला आहे.
अँकर अंजना कशपजी बरोबर बोलल्या होत्या आदित्य हा महाराष्ट्राचा पप्पू आहे, उद्धव ठाकरे यांनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेले 10% मी संपवणार please. https://t.co/wv5BOTq7Dk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 22, 2022
थोडक्यात बातम्या –
जम्बो कोविड सेंटरबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल
मॅगझीनसाठी रणवीर सिंग झाला विवस्त्र, न्यूड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो
अंबादास दानवेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…
राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च
Comments are closed.