Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

मुंबई | आग्रामधे बांधण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं देणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. याचाच धागा पकडत ठाकरे सरकरावर निशाणा साधताना महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले असल्याची जहरी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज” यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी मराठा आरक्षणावरूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

जवळपास तीन चार दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. आम्हाला अशोक चव्हाण यांच्या कामाचा अनुभव आहे ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाही आणि पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल, असं निलेश राणे यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधताना म्हटलं आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी राज्य सरकारला थेट मुघलांची सत्ता अशी उपमा दिल्याने ठाकरे सरकार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

रामदास आठवले हे अर्धशटर बंद झालेलं दुकान आहे- अनिल परब

“मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे”

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा गेला एक लाखांच्या वर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या