Top News महाराष्ट्र मुंबई

‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई | भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर मंत्र्यांचे बंगले दालनांवर केलेल्या खर्चावरून निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या बातमीचा राणेंनी संदर्भ घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे शासकीय बंगल्यात राहत सुद्धा नाही तरीदेखील त्यांच्या बंगल्यावर करोडोचा खर्च कशासाठी?? शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला आणि नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे, असं राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राणेंनी केलेल्या टीकेवर ठाकरे सरकारकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

रतन टाटांच्या बायोपिकमध्ये आर माधवन करणार काम?; माधवन म्हणाला…

“भाजप नेत्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या