Top News महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणात विरोधकांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजप निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करत जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे. त्यांना साधं दुकानही चालवता येत नाही.  त्यांनी अंगावर छाताडावर येण्याची वार्ता करू नये. जेवढे दिवस मुख्यमंत्री म्हणून मिळालेत, ते दिवस घालवावेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार आहे. आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनाही हे माहित असल्याचं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल जी भाषा वापरली ती अत्यंत चुकीची आहे. एवढाच सामना करायचा असेल तर एकदा होऊन जाऊ द्या, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!

‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांचा 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा…; खासदार भावना गवळींचा इशारा

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या