बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”

मुंबई | एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर 26 दिवसांनी जामीन मंजूर झाला. आर्यन खानच्या अटकेपासूनच दोन गट आपापसात भिडताना दिसत होते. आर्यन खानच्या अटकेच्या विरोधात असलेले आणि अटकेची कारवाई करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये चांगलेच शाब्दिक वाद रंगलेले पाहायला मिळत होते.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपाच्या फैरी आणि त्यांच्याविरोधातील खुलास्यांचा सपाटा लावला होता. आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिकांवर जोरदार निशाणा साधला आहे. आर्यनला बेल मिळाली, रात्री नवाब सुखानेे झोपला असेल, अशी खोचक टीका निलेश राणेंनी नवाब मलिकांवर केली आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, आर्यन मोठे युद्ध जिंकून आला की त्याने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं जो तो सुटल्यानंतर काही मोजक्या तरूणांनी फटाके वाजवले. तर नवाब मलिकला अशीच पिढी घडवायची आहे आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री असल्याची बोचरी टीका निलेश राणेंनी नवाब मलिकांवर केली आहे.

एनसीबीने कॉर्डेलिया क्रुझवर छापा टाकत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्यांचा जामीन अनेकदा फेटाळण्यात आला. आर्यनचे वकिल मुकुल रोहतगी यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटकेत असलेल्या अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांचा जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामीनानंतर शाहरूखच्या फॅन्सकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

 

 

थोडक्यात बातम्या-

पुणे विमानतळावरून विमानांची उड्डाण पुन्हा होणार सुरू! पण ‘या’ वेळात हवाई वाहतूक बंदच

भाजपचे ‘हे’ माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More