महाराष्ट्र मुंबई

“अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती”

मुंबई | वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?, असं म्हणत शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून पहिल्यांदाच आरएसएसवर टीका केली होती. यावर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पटलवार केला आहे.

स्वर्गीय बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

1947 साली स्वातंत्र्यदिन संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही, काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे, असं म्हणत शिवसेनेनं टीका केली होती.

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या संघटना 2002 पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ फडकवायला तयार नव्हत्या, अशी कडवट टीका शिवसेनेनं संघावर अग्रलेखातून केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“वीर सावरकरांची ढाल! भाजपचा पुळका खोटा”; ‘सामना’तून भाजपवर बाण

ठाकरे सरकारचा भाजपला पुन्हा धक्का; भाजपच्या बड्या नेत्याची नियुक्ती रद्द

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

महत्वाच्या बातम्या-

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती- जितेंद्र आव्हाड

फक्त दहा रुपये भरा, पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या