बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंचं टीकास्त्र

मुुंबई | शिवप्रतिष्ठानचे संभाजी  भिडे यांच्या सांगली बंदच्या हाकेमागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत पण नाही आणि काही करत पण नाही. पण कोण समाजाला मदत करतो तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं, असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचं मला वाटतं. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे.


ट्रेंडिंग बातम्या-

बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

मंच संगमनेरचा… आदित्य-रोहित-आदिती-झिशान-धिरज यांची उपस्थिती!

उदयनराजेंचा अपमान सहन करू शकत नाही- संभाजी भिडे

संभाजी भिडेंच्या सांगली बंदच्या हाकेमागे मोठं राजकीय षडयंत्र – सुप्रिया सुळे

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More