बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेनं केलंय”

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत बेळगावात होते. महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. शुभम शेळके यांच्या समर्थनार्थ संजय राऊत यांनी बेळगावमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या. आता बेळगावातील प्रचारसभा थंडावल्या असल्या तरी राजकारण तापताना दिसत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर आक्रमकपणे टीका केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार आहे. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊतांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आहे आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेनं केलंय. जी एकी समितीमध्ये होती त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी आम्ही अजित पवारांना मुत्र्या म्हणालो तर राष्ट्रवादी वाल्यांना ते आवडणार नाही, म्हणून अजित पवारांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलताना विचार करून बोलावं, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण…’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

“अजित पवार सर्जन आहेत”; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे पुन्हा भाष्य

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आले धावून; उचललं हे मोठं पाऊल!

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

कुणाचा पगार वाढला, कुणाचा कमी?; वाचा भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारा नवा पगार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More