निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख

निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख

मुंबई |  बेस्ट कर्मचाराऱ्यांच्या संपावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निलेश राणेंनी संजय राऊतांचा ‘हरामखोर’ तर उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ असा उल्लेख केला आहे.

बेस्ट कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर बसलेत आणि हे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मजा करत आहेत, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

या ‘हरामखोर’ संजय राऊतांनी बेस्ट कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची खिल्ली उडवली आणि त्याच कार्यक्रमामध्ये ‘नीच’ उद्धव ठाकरे उपस्थित होता, अशा आशयाचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, नवा वेतन करार आणि कनिष्ठ क्षेणीबाबतच्या मागणीसाठी बेस्टच्या 32 हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा- नरेंद्र मोदी

-पंड्या व राहुलच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात संधी

-सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, उद्या नाक दाबणार- मनसे

-… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

-केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग

Google+ Linkedin