बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

मुंबई | मागील काही दिवसांपासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच खळबळजनक खुलासाचं सत्र सुरूचं आहे. नवाब मलिकांनी सकाळीच ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे ड्रग पेडलरसोबत कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निलेश राणेंनी नवाब मलिकांवर निशाणा साधत ट्विटरद्वारे बोचरी टीका केली आहे.

नवाब मलिकांनी सकाळीच देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे ड्रग पेडलरसोबतचे फोटो ट्विट केले आहेत. त्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचे आरोप केले आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिकांवर टीका करत मलिकांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप केला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, नवाब मलिक याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करा. एका राजकीय नेत्यासोबत अनेक लोक फोटो काढतात. असेच आरोप स्वर्गीय आर. आर. पाटील आणि अजित पवार यांच्यावर देखील झाले होते. नवाब मलिक नको ती मर्यादा ओलांडू नका, भारी पडेल, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.

नवाब मलिकांनी आज सकाळीच “चलो आज बीजेपी और ड्रग्ज पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है” म्हणत अमृता फडणवीस आणि एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ड्रग्ज पेडलर जयदीप राणा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी  ट्विटचा आधार घेत आता भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर

‘त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेल’; देवेंद्र फडणवीस आक्रमक

“त्यांना समीर वानखेडेंची एवढी आपुलकी का वाटतीये?”

“दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मोदींच्या मंत्रिमडंळात कसा?”

अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More