मुंबई | दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे, असं म्हणत महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
बच्चू कडू…. तुमच्यासारखा वाघ या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता… राजीनामा देऊन वेगळे व्हा, असा सल्ला निलेश राणे यांनी आमदार बच्चू कडू यांना दिला आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत आम्हाला किती लुटलं गेलं याचा हिशोब केला तर सरकारकडेच आमचे पैसे निघतील, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.
बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ ह्या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकार मध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता… राजीनामा देऊन वेगळे व्हा. https://t.co/LopiZOC1v0
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 6, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
हेलिकॉप्टर घ्यायचंय तेही कष्टाच्या पैशातून- रोहित पवार
अजूनही मला विश्वास बसत नाही, माझाही फोन टॅप केला असावा; नाथाभाऊ कडाडले
महत्वाच्या बातम्या-
काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आता शिवसेनेच्या वाटेवर?
माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलंच नाही; आव्हाडांच स्पष्टीकरण
काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर देशाने कधीच प्रगती केली नसती- नरेंद्र मोदी
Comments are closed.